
संभाजीनगरमध्ये आज कोरोनाचे 438 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 11 हजार 241 वर पोहोचली आहे. आज 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 6 हजार 300 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या 4 हजार 541 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 25, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 139 आणि ग्रामीण भागात 89, जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या तपासणीत 10 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
4 जणांचा मृत्यू
आज घाटीमध्ये 3 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रामगोपाल नगर मधील 48 वर्षीय पुरुष, एन 7 सिडको मधील 52 वर्षीय पुरुष, बकापूर, पळशी येथील 45 वर्षीय स्त्री आणि शहरातील एका खासगी रुग्णालयात सिटी चौकातील 74 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.



























































