
धावत्या लोकलमध्ये चोरांनी सुसाट हातसफाई केल्याचे समोर आले आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत चोरांनी प्रवाशांचे तब्बल 46 मोबाईल लंपास केले. गर्दीचा गैरफायदा घेत चोरांनी आपले काम साध्य केले.
शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत पश्चिम व मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांत चोरांनी प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारला. लोकलला होणाऱ्या गर्दीचा पुरेपूर फायदा उचलत चोरांनी प्रवाशांच्या मोबाईलला लक्ष्य केले. लोकलमध्ये चढताना, उतरताना तसेच गर्दीत रेटारेटी करून चोरांनी 46 मोबाईल लांबविल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येते.