कोल्हापुरात 466 जण कोरोना संशयित, एका तरुणाला विषाणूची लागण

1598

संपूर्ण देश लॉकडाऊन होऊन, सर्वत्र कडक संचारबंदी सुरू असतानाही कोरोना विषाणुची धास्ती आणि बेरोजगारीमुळे आपापल्या गावी मिळेल त्या वाहनाने आणि मैलोनमैल पायपीट करत, झुंडीच्या झुंडी जात आहेत. कोल्हापुरातही एका दिवसात परदेशातुन 14 तर मुंबई,पुणे आदी शहरांतुन तब्बल 12 हजार 156 जण आले आहेत. तर आणखी 22 जणांमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्याने,संशयितांची संख्या 466 झाली आहे.सध्या जिल्ह्यात एकाच तरुणाचा अहवाल पॉझीटिव्ह आला असुन अजूनही 69 जणांचे अहवाल आले नाहीत.आतापर्यंत परदेशातुन 796 तर मुंबई,पुणे आदी शहरांतुन 63 हजार 855 जण जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

दरम्यान पुण्याहुन आलेल्या तरुणाचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर तो रहात असलेल्या भक्तीपूजा नगर, मंगळवार पेठ येथील पाचशे मीटर परिसर पुर्णतः सीलबंद करून प्रतिबंध क्षेत्र जाहिर करण्यात आला आहे. तर या बाधीत तरुणाच्या कुटुंबीयांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या घशातील नमुने शुक्रवारी तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत. दुसर्‍या दिवशी रात्री उशिरापर्यंत अहवाल आला नसल्याने या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर गेल्या चोविस तासांत जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार परदेशातुन आणखी 14 जण आल्याने, आतापर्यंत परदेशातुन जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची संख्या 795 झाली आहे. यामधील 312 जणांची 14 दिवसांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.यातील 484 जण घरी देखरेखीखाली आहेत. तर देशात मुंबई, पुणे सह करोनाबाधीत शहरातुन गेल्या दहा-बारा तासांतच तब्बल 12 हजार 166 जण आल्याने आतापर्यंत हा आकडा 63 हजार 855 जणांची नोंद झाली आहे. यापैकी घरी 57 हजार 785 जणांना विलगीकरण करण्यात आले आहे. तर यातील 6 हजार 70 जणांची 14 दिवसांची तपासणी पूर्ण झाली आहे. सध्या 466 जण कोरोना सदृश्य लक्षणामुळे उपचार घेत आहेत. आतापर्यंत 165 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.यातील 87 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असुन, 69 अहवाल अप्राप्त आणि 8 जणांचे नमुने फेटाळले आहेत. जिल्ह्यात सध्या एकाचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालातुन स्पष्ट होते.

आपली प्रतिक्रिया द्या