मुंबईच्या संकेतकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

हिंदुस्थानी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने होणाऱ्या चौथ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा पुरुष संघ जाहीर करण्यात आला आहे. मुंबई शहराच्या संकेत सावंतकडे पुरुष संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिर मैदानातील मॅटवर 2 ते 5 मे या कालावधीत ही स्पर्धा खेळविण्यात येईल. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पात्र ठरलेल्या पहिल्या आठ संघांना या स्पर्धेत प्रवेश दिला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचा महिला संघ या स्पर्धेत नाही. या स्पर्धेकरिता निवडण्यात आलेला हा संघ बारामती येथील बारामती स्पोर्टस् अकादमी येथे सराव करीत होता. या स्पर्धेपासून 12 ऐवजी 14 खेळाडूंना परवानगी देण्यात आली.

महाराष्ट्राचा संघ

संकेत सावंत (कर्णधार), बालाजी जाधव, शंकर गदई, तेजस पाटील, अक्षय सूर्यवंशी, मयूर कदम, शिवम पठारे, सुरेश जाधव, आदित्य शिंदे, प्रणय राणे, अजित चौहान, आदित्य पोवार, ऋषिकेश बनकर, जयेश महाजन. प्रशिक्षक ः दादासो आवाड.