जळकोट: टेम्पो-पिकअपच्या भीषण अपघातात पाच ठार, सहा जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
5-died-in-an-accident-jalkot

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

जळकोट तालुक्यातील धामणगाव पाटी जवळ भरधाव वेगातील आयशर टेम्पोने पिकअप ऑटोला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर सहाजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे.

अमदपूर तालुक्यातील विळेगाव येथे एका लग्नसमारंभासाठी जळकोट तालुक्यातील धामणगाव येथील सोनकांबळे कुटुंबीय आपल्या पिकअप ऑटो मधून गेले होते. लग्नसमारंभ आटोपून धामणगावला जात असताना भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने पिकअप ऑटोला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये पुष्पा ज्ञानोबा सोनकांबळे (वय 55), ज्ञानोबा सुदाम सोनकांबळे (वय 60), कांता बळीराम सोनकांबळे (वय 60), ऑटोचालक अरविंद बळीराम सोनकांबळे (वय 25), पूर्वी सोनकांबळे (वय पाच) यांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले असून जखमींना अहमदपूर व जळकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.