
Realme 8s हा फोन लॉन्च होण्यापूर्वीचे त्याचे स्पेसिफिकेशन आणि डिझाईन ऑनलाईन लीक झाले आहेत. हा फोन लवकरच हिंदुस्थानात लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये 5GB चा Virtual RAM असणार आहे. तसेच 33 वॅट फास्ट चार्जिंगची सुविधा असून त्यात मिडियाटेक डायमेंसिटी 810 प्रोसेसरचाही समावेश आहे.
Realme 8s लवकरच हिंदुस्थानात लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड सिस्टम असणार आहे. तर त्यात 6 जीबी आणि 8 जीबी रॅमचा पर्याय असणार आहे. तसेच फोनमध्ये 5 जीबीचा व्हर्च्युअल रॅम असणार आहे.
फोनमध्ये ट्रिप्ल रियर कॅमेऱ्य़ाचे फीचर देण्यात आले आहे. त्यात प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात 128 जीबी आणि 256 जीबी इंटर्नल मेमरीचा पर्यायही ग्राहकांना मिळणार आहे. फोनची युएसबी टाईप सी असणार आहे. तर 33 वॅट फास्ट चार्जिंगचे विशेष फीचर असणार आहे. या फोनची किंमत किती असेल हे अजून कळालेले नाही.






























































