
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर नेहमीच असलेली अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होणार आहे. भाविकांच्या सुरक्षेचा विचार करत केंद्र सरकारने यात्रेतील भाविकांना आता 5 लाखांचा विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक यात्रेकरूला पहिल्यांदाच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन अर्थात आरएफआयडी टॅग दिले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत मंगळवारी बैठक घेऊन जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.


























































