राजुरा येथील सीमा तपासणी नाक्यावरील 5 लाखांची रक्कम लांबवली

911

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील आसिफाबाद महामार्गातील लक्कडकोट येथील सीमा तपासणी नाक्यातील जमा महसुलाची 4 लाख 74 हजार रुपयांची रक्कम दुचाकीने बल्लारपूर येथे येत असता कारने काही व्यक्तींना धमकी देत मोबाईल व रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात नाकाबंदी करून पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.

लक्कडकोट येथे अद्ययावत आंतरराजिय सीमा तपासणी नाका आहे. या नाक्यातंर्गत जमा झालेली सीमाशुल्क रक्कम दररोज बँकेत जमा केली जाते. नेहमीप्रमाणे सोमवारी कार्यरत कस्टोडिअण वैभव गुलाब टोंगे दुचाकीने कार्यालयातील 4 लाख 74 हजार रुपयांची रक्कम घेऊन बल्लारपूरकडे निघाले होते. सिद्धेशवरजवळ एक कार आडवी करून वैभव यास थांबहुन मारहाण करीत त्याच्याकडील एक हजार रुपये आणि कार्यालयातील 4 लाख 74 हजार रुपये,एक मोबाईल हिसकाऊन चोरट्यांनी पळ काढला. मारहाण करणारे चारजण असून ते राजुरा मार्गाने निघून गेल्याचे तक्रारदाराने सांगतले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांना माहिती मिळताच सर्व पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली असून सर्वत्र नाकाबंदी करून तपास सुरु आहे.

एवढी मोठी रक्कम दुचाकीने घेऊन जाण्याची परवानगी कुणी आणि कशी दिली असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज हजारो रुपयांचा महसूल जमा होत असेल तर त्याची विशेष दक्षता का घेतली नाही असे प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची वैभव टोंगे याचे तक्रारी वरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या