कोल्हापुरात 5 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 687 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आणखी नव्या पाच रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 687 वर गेली आहे. तर 21 जणांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 476 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मिळालेल्या 90 अहवालांपैकी आजरातील 2 आणि गडहिंग्लजमधील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या 203 पॉझिटिव्ह रुग्णांवर कोरोना कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.

आतापर्यंत आजरा- 74,भुदरगड-68,चंदगड-72, गडहिंग्लज-78,गगनबावडा-6,हातकणंगले-7, कागल-56, करवीर-14, पन्हाळा-25, राधानगरी- 63, शाहूवाडी- 174, शिरोळ-7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-24 असे एकूण 679 आणि पुणे-1,सोलापूर-3,मुंबई-1,कर्नाटक -2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 मिळून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 687 वर गेली आहे.