
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव शहरातील खडकी भागाता राहणाऱ्या दोन तरूणांना मोटारसायकल चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी कोपरगाव परिसरातून आणखी काही बुलेट चोरल्या असून त्या परळी जि. बीड येथील साथीदरांमार्फत विकल्याचे उघड झाले आहे. या आरोंपीची माहिती घेऊन पोलीसांनी आणखी तीन अशा एकूण पाच जणांना अटक केली आहे.
कोपरगाव शहरातील खडकी येथे राहणारे रवी वाल्मीक चव्हाण याने माणीक बंडू सोमासे यांची 25 हजाराची हिरो होडा सीडी डिलक्स एमएच 17 बीए, 6373 चोरून नेली होती. त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने आपण निलेश अर्जन दवंगे (21, रा. खडकी) याच्या मदतीने ती चोरल्याचे सांगितले. त्या दोघांची पोलीस कोठडीत चौकशी केली असता त्यांनी आपण कोपरगाव परिसरातून आणखी बुलेट चोरल्याचे सांगीतले. त्या बुलेट नाना उर्फ परमेश्वर पंडीतराव आघाव (32, रा. दौनापुर, ता. परळी, जि. बीड), बबन शंकर जाधव (23, रा. निंबुटा तांडा ता. परळी, जि. बीड) यांना दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या गावातुन त्यांना ताब्यात घेऊन चोकशी केली. त्यांचा साथीदार किरण गजरवाल (रा. मंगळवार बाजार, हिंगोली) याच्या मदतीने मोटार सायकल परभणी , हिंगोली व परळी परिसरात विकल्याचे सांगितले. आरोपींकडून परळी, परभणी, हिंगोली परिसरातून बुलेट मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.त्यांच्यावर कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ईशु सिंधु, पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस नगर, रोहिदास पवार, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, सोमनाथ वाघचौरे उपविभागीय अधिकारी शिर्डी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, नगरचे पोसई गणेश इंगळे, सफौ. सोन्याबापु नानेकर, पोहेकॉ. विजयकुमार वेठेकर, पोना. विशाल दळवी, रविंद्र कर्डीले, रवि सोनटक्के, विजय ठोंबरे, चालक बबन बेरड तसेच कोपरगाव पोस्टेचे पोहेकॉ. आर पी. पुंड, पोकॉ. एस.जे अगरवाल, पोकॉ. आर.सी. कोतकर, यांनी केली.

























































