
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हिंदुस्थानवर लादलेला 25 टक्के टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याचा मोठा परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर जगासह देशाचा शेअर बाजारात घसरण होत आहे. आता ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये दुप्पट वाढ केल्याने त्याचा बाजारावर परिणाम होणार असून मोठ्य प्रमाणात विक्री होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेने रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी हिंदुस्थानने थांबवावे, अन्यथा अतिरिक्त शुल्क लादण्याची धमकी दिली होती. हिंदुस्थानने त्याला प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.लादलेले शुल्क अतिशय दुर्दैवी, अन्याय्य, अन्याय्य आणि विसंगत म्हटले आहे आणि म्हटले आहे की अमेरिकेने हिंदुस्थानवर अशा गोष्टींसाठी अतिरिक्त शुल्क लादले आहे, जे इतर अनेक देश त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी स्वीकारत आहेत. हिंदुस्थान आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल, असे हिंदुस्थानने स्पष्ट केले होते.
ट्रम्पच्या सततच्या टॅरिफ धमक्यांमुळे भारतीय शेअर बाजार आधीच मंदावला आहे. मंगळवारी ट्रम्प यांनी 24 तासांत हिंदुस्थानवर कर वाढवणार असल्याचे विधान केले होते, तेव्हा बुधवारी त्याचा परिणाम सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीच्या स्वरूपात दिसून आला आणि दोन्ही निर्देशांक दिवसभर घसरत होते. आता ट्रम्प यांनी अतिरिक्त 25% कर लादत तो 50 टक्के केला आहे, त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सुरू असलेली घसरण आणखी वाढू शकते.
नवीन कर लागू होण्यासाठी अद्याप 20 दिवस शिल्लक आहेत आणि हा अतिरिक्त कर 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्यामुळे अमेरिका-रशिया आणि अमेरिका-हिंदुस्थान यांच्यात काही मुद्द्यांवर करार होण्याची आशा आहे. त्याचा परिणाम झाला तर बाजारातील मंदीला ब्रेक लागू शकतो. मात्र, सद्यस्थितीत बाजार अचानक 1-2 टक्क्यांनी घसरू शकतो. मात्र, अशीच परिस्थिती कायम राहिली तर गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.