कोल्हापुरात 81 जागांसाठी 546 उमेदवार रिंगणात

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 81 जागांसाठी 546 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांनी अचानक माघार घेतली आहे. या निवडणुकीत भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतु, त्यांचा इशारा हा फुसका बार ठरला असून त्यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले आहे.