
सोलापूर मनपाच्या वतीने प्रमुख 12 ठिकाणी तयार करण्यात आलेल्या विसर्जन कुंडांमध्ये शहरातील 56 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर तीन फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या 305 गणेशमूर्तींचे हिप्परगा परिसरातील एका दगडखाणीत विसर्जन करण्यात आले, तर 84 मूर्ती विविध मंडळांकडून संकलित करण्यात आल्या. आज दुपारी तीनपर्यंत गणेश विसर्जन सुरू होती. तब्बल 47 टन निर्माल्य संकलित करण्यात आले असून, मोठय़ा मूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.
सोलापूर, दि. 10 (प्रतिनिधी) – दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सवावर निर्बंध होते. यंदाच्या वर्षी मंडळांचा उत्साह निसर्गाने दिलेली साथ यामुळे शहर व जिह्यातील गणेश उत्सवाची सांगता मोठय़ा जल्लोषात झाली. तब्बल 24 तास मिरवणूक सुरू होती. मंडळाची शिस्तबद्धता देखावे व प्रशासनाचे सहकार्य यामुळे हा सांगता उत्सव आनंदमय ठरला.
मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळाची मिरवणूक शुक्रवारी दुपारी सुरू झाली. मानाच्या देशमुख वाडा येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मिरवणूक मार्ग दुमदुमून गेले होते. गणेश भक्तांनी फुलून गेलेले रस्ते व गणेश दर्शनासाठी भक्तांची मिरवणुकीत गर्दी झाली होती. विजापूर रोड, पूर्वभाग, जुने सोलापूर, लष्कर आदी भागातील मध्यवर्ती गणेश मंडळात यंदा मोठा जल्लोष दिसून आला, चौत्रापूना नाका, थोरला मंगळवेढा तालीम, कसबा गणपती, पत्रा तालीम, लाल आखाडा, मंगळवेढेकर चाळ, राजस्थानी मंडळ यांच्यासह अनेक मंडळांनी देखाव्यांबरोबरच लेझीमचा शिस्तबद्ध बहारदार खेळ सादर केला. या शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे पोलीस व प्रशासनावरील ताण कमालीचा कमी झाल्याचे दिसून आले. अनेक पोलीस अधिकारी व महिला अधिकारी व कर्मचाऱयांनी लेझीम खेळात भाग घेऊन उत्सावाचा आनंद लुटला
सोलापूर महापालिकेने विसर्जनासाठी गणपती घाट, विष्णू घाट, संभाजी तलाव, हिप्परगा तलाव परिसरासह 84 ठिकाणी सोयी केल्या होत्या. यासाठी पालिकेचे 600 व कंत्राटी 400 कामगार नेमण्यात आले होते. तीन फुटांहून अधिक उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र यंत्रणा ठेवण्यात आली होती.
गणेश उत्सवानिमित्त सुमारे 200 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तीन पोलीस उपायुक्त, 8 सहायक पोलीस आयुक्त, 27 पोलीस निरीक्षक, 85 सहायक पोलीस निरीक्षक व फौजदार एसआरपीएफची एक कंपनी तैनात करण्यात आली होती.
लष्कर गणेशोत्सक मध्यकर्ती महामंडळ मिरकणुकीदरम्यान डॉल्बीचा आकाज जास्त असल्याने पोलिसांनी विजेचा पुरवठा करणाऱया पीना काढून नेल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मिरकणूक थांबकली. मात्र, मध्यकर्तीच्या ज्येष्ठ संस्थापक सदस्यांनी हस्तक्षेप केल्याने मिरकणूक मार्गस्थ झाली. दरम्यान, पोलीस निरीक्षक अश्किनी भोसले यांनी नियमाच्या वर साउंडचा आकाज असेल, नाहीतर गुन्हे दाखल कराके लागतील असा इशारा दिला.




























































