मामाच्या गावाला जाऊया! मध्य रेल्वेकडून 574 विशेष ट्रेन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने एप्रिल ते जून 2022 या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे, नागपूर आणि साईनगर शिर्डी येथून विविध ठिकाणी 574 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

यात खालील विशेष ट्रेन समाविष्ट आहेत:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड/ नागपूर/ मालदा टाउन/ रीवा दरम्यान 126 उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.

दादर आणि मडगाव दरम्यान 6 उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार/ बलिया/ गोरखपूर/ समस्तीपूर/ थिवि दरम्यान 282 उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.

पनवेल आणि करमळी दरम्यान 18 उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.

नागपूर आणि मडगाव दरम्यान 20 उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.

पुणे आणि करमळी/ जयपूर/ दानापूर/ वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन/ कानपूर सेंट्रल दरम्यान 100 उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.

साईनगर शिर्डी आणि ढेहर का बालाजी दरम्यान 20 उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.

लातूर आणि बिदर दरम्यान 2 उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.

या सर्व उन्हाळी विशेष ट्रेनचे बुकिंग आधीच सुरू झाले असून www.irctc.co.in वर लॉग इन करा किंवा आरक्षणासाठी जवळच्या संगणकीकृत आरक्षण केंद्राला भेट अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.