रत्नागिरी जिल्ह्यात 59.20 टक्के मतदान; 32 उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद

688

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 59.20 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यात पाच मतदारसंघ असून दापोली मतदारसंघात 62 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात महायुतीचे योगेश कदम आणि आघाडीचे संजय कदम अशी लढत आहे. गुहागर मतदारसंघात 57.47 टक्के मतदान झाले.या मतदारसंघात महायुतीचे भास्कर जाधव विरूध्द आघाडीचे सहदेव बेटकर यांच्यात लढत आहे.चिपळूण मतदारसंघात 63 टक्के मतदान झाले.चिपळूणात महायुतीचे उमेदवार सदानंद चव्हाण विरूध्द आघाडीचे शेखर निकम अशी लढत आहे. रत्नागिरी मतदारसंघात 62 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदय सामंत आणि आघाडीचे उमेदवार सुदेश मयेकर यांच्यात लढत आहे. राजापूर मतदार संघात 50 टक्के मतदान झाले.राजापूरात महायुतीचे उमेदवार राजन साळवी विरूध्द आघाडीचे अविनाश लाड अशी लढत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या