
पांडव लेणी भागात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱया सहा बांगलादेशी महिला व एजंटला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या महिला विनापरवाना राहत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संतोष फुंदे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री तेथे छापा टाकला. शिल्पी अकनेर, सौम्या नायक ऊर्फ सुलताना शेख, मुनीया खातून, सोन्या मंडल ऊर्फ शेख, मुक्ता शेख, शामोली खान यांना ताब्यात घेतले.
























































