बंद घराचे कुलप तोडून 6 लाखांचे दागिने चोरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 5 लाख 90 हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना फुरसुंगी भागात घडली. क्रितीका मिश्रा (वय 28,रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.

क्रितीका मागील महिन्यात बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून कपाटातील 5 लाख 90 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. गावाहून परत आल्यानंतर क्रितीका यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करत आहेत.