
बुलढाणा जिल्ह्यात रविवारी मिळालेल्या अहवालांपैकी 6 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 502 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 24 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 19 कोरोनाबाधित रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे बरे होऊन घरी पाठवण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 19 झाली असून सध्या रूग्णालयात 4 रूग्ण उपचार घेत आहेत.
रविवारी 6 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 6 अहवाल निगेटिव्ह आहेत. तसेच रविवारी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 75 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 4 आहेत. आतापर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 502 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे.


























































