राज्यात 60 हजार अनधिकृत स्कूल बसेस, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

राज्यात सध्या सुमारे 50 ते 60 हजार बसेस अनधिपृतपणे धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची शाळेतून ने-आण करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण सभागृहात स्पूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

2011 च्या नियमावलीनुसार सध्या 40 हजार स्पूल बसेस राज्यभरात आपली सेवा देत आहेत. परंतु याव्यतिरिक्त 50 ते 60 हजार अनाधिपृत स्पूल बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करत असल्याच्या अनेक तक्रारी या बैठकीत स्पूल बस चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केल्या.

तीन महिन्यांत दंडात्मक रक्कम भरा
अनधिपृतपणे विद्यार्थ्यांची ने-आण करताना कारवाई केलेल्या स्पूल बसेसना पुढील तीन महिन्यांत दंडात्मक रक्कम भरून त्या बसेस अधिपृत करून घेण्यात याव्यात. मात्र तीन महिन्यांनंतर ज्या प्रादेशिक परिवहन विभागांमध्ये अशा प्रकारच्या अनधिपृत स्पूल बसेस आढळल्यास संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱयांनाही कठोर कारवाईला समोर जावे लागेल, असाचा इशारा सरनाईक यांनी दिला.