परभणी : अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जाच्या बोज्याखाली दबून आत्महत्या

239

परभणी तालुक्यातील झरी येथून जवळच असलेले जलालपूर येथील अल्पभूधारक शेतकरी दिगंबर सखाराम पुंजारे (60, रा. जलालपूर ) यांनी आपल्या शेतात चिलाटीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या डोक्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा झरी एक लाख पन्नास हजार रुपयाचे कर्ज होते.

मागिल तीन वर्षापासून होणारी नापिकी, तसेच या वर्षी चांगले पीक येऊनही पावसाचा पत्ता नसल्यामुळे पिके सुकत होती. याच चिंतेत ते नेहमी असायचे. संसाराचा गाडा कसा कसा चालवायचा या विवंचनेतून त्यांनी रविवारी दुपारी आत्महत्या केली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन परभणी येथे गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. अधिक तपास पीएसआय रत्नाकर गायकवाड करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या