आसाममध्ये 644 दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण

656

आसाममध्ये बंदी घातलेल्या आठ संघटनेच्या 644 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व दहशतवादी उल्फा, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआइ (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबी या संघटनेचे होते. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात सर्व दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

हा दिवस महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सात संघटनेच्या 644 दहशतवद्यांनी हत्यारांसह आत्मसमर्पण केले. सर्व दहशतवाद्यांकडे एके 47, एके 56 सारखे हत्यारे होते.

2019 मध्ये 240 हून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. सर्व दहशतवादी गेली 10 वर्षे दक्षिण आसाम, मिझोर आणि त्रिपुरामधील हिंसक घडामोडींमध्ये त्यांचा हात होता.

आपली प्रतिक्रिया द्या