
नगर जिह्यातील पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया तीन ते चार दिवसांमध्ये राबविली जाणार आहे. बदलीसाठी 650 कर्मचाऱयांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
नगर जिह्याच्या सर्वच विभागांमध्ये बदल्यांचे वारे सुरू आहे. जिल्हा परिषदेच्याही बदल्या सध्या सुरू आहेत. त्यापूर्वीच जिल्हा पोलीस दलातील बदल्यांचा निर्णय घेण्यात आला होता. विनंती बदल्यांसाठी कर्मचाऱयांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले होते. तसेच जिह्याबाहेरून आलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांच्या नेमणुका करून रिक्त पदे भरण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. 25हून अधिक कर्मचारी जिह्याच्या बाहेरून आलेले होते. त्यांना जिह्यात समाविष्ट करण्यात आले असून, जिह्यात पोलीस बळाची संख्या कमी असल्यामुळे अधीक्षक पाटील यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये आंतरजिल्हा बदल्यांना नकार दिला होता. जिह्यातील पोलीस दलातील बदल्यांची प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सुरू होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितल्यानुसार 650 कर्मचाऱयांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केले आहेत.

























































