ब्रेकिंग : टॉपच्या कमांडरसह 66 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी 2019 ते आतापर्यंत खोऱ्यात 66 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यातील 27 दहशतवादी हे पुलवामा हल्ला घडवणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. यापैकी 19 दहशतवादी हे पुलवामा हल्ल्यानंतर ठार करण्यात आले आहेत. या आकडेवारीला अद्याप लष्कराकडून दुजोरा मिळालेला नाही. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

पुलवामा हल्ल्यामध्ये हिंदुस्थानचे 40 पेक्षा जास्त जवान हुतात्मा झाले होते. यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला, तसेच जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम हाती घेऊन त्यांचा खात्मा करण्यात आला. पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या 45 दिवसांमध्ये या हल्ल्यात सहभागी असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या टीमचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले. तसेच या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी आणि निर्वासितांनाही अटक करण्यात आली.

पुलवामा हल्ल्यामध्ये थेट संबंधीत असलेल्या चार दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्थान घातले, तर अन्य चौघांना अटक करण्यात आली. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी जैशचा कमांडर कामरानला 18 फेब्रुवारीला, मुशबीर अहमद खान आणि सज्जद भटला 11 मार्चला कंठस्थान घालण्यात आले. तसेच निसार अहमद तंत्रे आणि सज्जद यांनीा एनआयने अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. यापैकी तंत्रे याच्यावर पुलवामा हल्ल्यासाठी आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दार याला मदत केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, अद्यापही जैशचे 40 दहशतवादी खोऱ्यामध्ये सक्रिय असून त्यांच्याविरोधात लष्कराने शोधमोहीम आखली आहे. लवकरच त्यांचा शोध घेऊन खात्मा करण्यात येईल असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले आहे.