महाराष्ट्राची मुले उपविजेते; मुलींना कांस्य

यजमान महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला 67 व्या राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेतील 19 वर्षांखालील गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर मुलींचा संघ कास्यपदकाचा मानकरी ठरला. बिहारच्या मुलांनी व मुलींनी स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवित सुवर्णपदकावर नाव कोरून दुहेरी धमाका केला. मुलांमध्ये दिल्ली संघाला कांस्यपदक मिळाले, तर मुलींमध्ये ओडिशाने रौप्यपदकाला गवसणी घातली. बालेवाडीत झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राला चूरशीच्या अंतिम लढतीत बिहारकडून 14-12 असा दोन गुणांनी पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बिहारकडून गोल्डन कुमारने 5, राजा कुमारने 4, तर राजन कुमारने 5 गुण मिळविले. मुलींच्या कास्यपदकाच्या एकतर्फी लढतीत महाराष्ट्राने छत्तीसगढचा 52-0 गुणांनी धुव्वा उडविला. मुली संघातील तृप्ती पाटील 5, नम्रता पाटील 26, समृद्धी कदम 5, स्वाती हगवणे 6, सुमन रावत 5, कावेरी बागुल 22 गुण मिळविले.

आहे. एकूणच बंगळुरू संघाची भट्टी जमलेली दिसत नाही. त्यामुळे आता किमान इभ्रत वाचविण्यासाठी हा रथी-महारथी खेळाडूंनी सजलेला संघ काय करामत करतोय, हे बघावे लागेल.