बुलढाण्यात आढळले कोरोनाचे 7 रुग्ण, 16 रुग्णांची कोरोनावर मात

बुलढाणा जिल्ह्यात आज कोरोनाचे 7 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 703 वर गेली आहे. आज 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 35 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 28 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 5 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 3 तर रॅपिड टेस्टमधील 25 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 28 अहवाल निगेटीव्ह आहेत.

आज 16 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत 8572 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 326 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   आज रोजी 253 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 8572 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 703 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 326 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 357 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 20 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या