लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात, 7 जवानांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखमधूल तुर्कुक सेक्टरमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला असून यात सात जवानांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 19 जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना विमानाने मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी 9 वाजता लष्कराचे हे वहान 26 जवानांना घेऊन परतपूर येथील ट्रांजिस्ट कॅम्पवरुन हानिफ सेक्टरकडे जात होते. अचानक वाहनचालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट 60 फूट खोल श्योक नदीत पडली. या अपघातात 7 जवानांचा जागीच मृत्यू झाला असून 19 जवान गंभीर जखमी झाले आहेत.