परभणीत 7 नवे रुग्ण आढळले; कोरोनाबाधितांची संख्या 149 वर

463

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडून सोमवारी सकाळी आलेल्या अहवालाप्रमाणे जिल्ह्यात 7 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. परभणीतील 2, तालुक्यातील झरी येथील 2 व गंगाखेड शहर व तालुक्यातील प्रत्येकी एक व मानवत शहरातील एक असे एकूण 7 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 149 एवढी झाली आहे. तसेच 98 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. संक्रमीत कक्षात आता 47 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

जिल्हा रूग्णालयातील संसर्गजन्य कक्षात एकूण 65 रुग्ण आहेत. विलगीकरण केलेले 127 जण असून विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 2608 एवढया व्यक्ती आहेत. त्यात परदेशातून आलेले 73 व त्यांच्या संपर्कात आलेल्या 6 व्यक्तींचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात 9 संशयित दाखल झाले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सर्व संशयितांची तपासणी केली. पाठोपाठ नांदेड येथील प्रयोगशाळेकडे ते नऊ व अन्य असे मिळून 11 जणांचे स्वॅब पाठविण्यात आले. त्यामुळे आता नांदेड येथील प्रयोगशाळेत प्रलंबीत स्वॅबची संख्या 11 एवढी आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आतापर्यंत एकूण 2800 संशयित दाखल झाले आहेत. 3015 जणांचा स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 2714 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह स्वॅबची संख्या 149 एवढी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या