कोपरगावात सरासरी 70 टक्के मतदान

723
प्रातिनिधिक फोटो

कोपरगाव विधानसभा मतदार संघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 69.4 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढूनही 10.91 टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी घसरली आहे. रविवारी पावसाची रिपरिप सुरू होती. सोमवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजेपर्यंत 49.96 टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी 75 ते 80 टक्क्यांपर्यंत असा अंदाज होता. माठत्र, प्रत्यक्षात शेवटच्या तीन तासात मतदानात अवघी 20 टक्क्यांनी वाढ झाली आणि 69.4 टक्के मतदान झाले.मतदानाची टक्केवारी घसरल्याने कोणाला फटका बसणार याबाबत चर्चा सुरू आहेत.

तालुक्यासह शहरात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्रात चोख बंदोबस्त होता. माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्हे ,महायुतीच्या उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन बिपीन कोल्हे, कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे, कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांच्यासह तालुक्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2014 च्या निवडणुकीत एकूण एक लाख 96 हजार 480 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी सुमारे 79.95 टक्के मतदान झाले होते. 2019 च्या निवडणुकीत दोन लाख 64 हजार 832 मतदाकांनी मतदान केले. यंदा 19 हजार 67 इतके मतदान वाढले असतानाही मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या