अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी 71 वर्षीय वृद्धाला 5 वर्षे कैदेची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी वृद्धाला येथील न्यायालयाने 5 वर्षे कैदेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस.गायकवाड यांनी ही शिक्षा सुनावली आहे. रामचंद्र जाधव (71) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषी वृद्धाचे नाव आहे.

26 मार्च 2018 रोजी पीडित मुलगी घरात एकटीच घरी असताना रामचंद्र जाधवने तिच्या घरात जाऊन तिच्यावर अतिप्रसंग केला होता. याबाबत संगमेश्वर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करुन जाधव विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून त्यानूसार खटला चालवला गेला. शनिवारी या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी रामचंद्र जाधवला 5 वर्षे साधी कैद व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास आणखी 2 महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच भा. दं. वि. कलम ४५१ अन्वये 2 वर्षे साधी कैद व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगायच्या आहेत. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड. विनय गांधी यांनी काम पाहिले.