
आसामला पुराचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 54 लाख विस्थापित झाले आहे. राज्याच्या आपत्ती निवारण विभागाने ही माहिती दिली आहे.
आसामध्ये पुरामुळे आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या 30 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून 53 लाख 99 हजार 17 लोक विस्थापित झाले आहेत. तसेच 2.4 लाख हेक्टर जमिनीवरील शेती नष्ट झाली आहे. या पुराग्रस्त भगातून आतापर्यंत 76 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेगौडा यांनी केंद्र सरकारकडे आसामला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

























































