पॉलिटेक्निकचे आतापर्यंत 75 हजार प्रवेश,17 सप्टेंबरला तिसरी फेरी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत दुसऱया कॅप राऊंडमध्ये प्रवेश दिलेल्या 78 हजार 435 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 75 हजार 303 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आता आजपासून तिसऱया फेरीला पसंतीक्रम पर्याय देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी तिसरी फेरीची विद्यार्थी प्रवेश निवड यादी जाहीर होणार आहे.

या वर्षी पॉलिटेक्निकच्या 365 संस्थांत 1 लाख 1 हजार 861 जागा आहेत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 35 हजारहून अधिक अर्जात वाढ झाली. या वर्षी 1 लाख 24 हजार 385 अर्ज आले होते. त्यापैकी पहिल्या फेरीसाठी सुमारे 1 लाख 1 हजार 224 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यामधील 66 हजार विद्यार्थ्यांना  प्रवेशाच्या पहिल्या फेरीत अलॉटमेंट मिळाले. त्यापैकी 58 हजार 045 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतील त्यानंतर जाहीर झालेल्या दुसऱया फेरीतील प्रवेश प्रक्रिया सोमवारी संपली. संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी आल्यामुळे एक दिवसाची मुदतवाढ दिली होती. सोमवारी सायंकाळपर्यंत 75 हजार 303 विद्यार्थ्यांनी प्रवेश कर्न्फम केले होते.  दहावीनंतरचे गुणवंत विद्यार्थी आयटीआय पाठोपाठ आता पॉलिटेक्निक प्रवेशाकडे मोठय़ा संख्येने आहेत. 13 ते 15 सप्टेंबर या काळात विद्यार्थ्यांना तिसऱया फेरीसाठी प्रवेशासाठी पसंतीक्रम देता येणार आहेत. त्या विद्यार्थ्यांची यादी 17 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.