
गुजरातमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही वृद्ध व्यक्ती अंध असल्याने त्यांना खाटेला बांधण्यात आले होते.
गुजरातच्या गीर जिल्ह्यात 75 वर्षीय मनुभाई सावलिया हे अंध होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना एका झाडाखाली खाटेवर बांधून ठेवले होते. तेव्हा रात्रीच्या वेळी बिबट्याने त्यांच्या हल्ला केला. या हल्यात मनुभाई यांचा मृत्यू झाला. सकाळी मनुभाई यांचा मृतदेह आढळला. तेव्हा या ठिकाणी बिबट्याचे पावलेही आढळले. पोलिसांनी मनुभाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.



























































