
मुंबईसह राज्यभरात 23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर आतापर्यंत प्लॅस्टिकविरोधात पालिकेने केलेल्या कारवाईत 4 कोटी 13 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत 76 हजार 282 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, ही कारवाई आगामी काळातही अशीच सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पर्यावरणसंवर्धनासाठी लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी पालिकेकडून सर्व 24 विभागांत जोरदार सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. नागरिकांनीही प्लॅस्टिक पिशव्या टाळून कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात केली मात्र काही ठिकाणी व्यावसायिक, फेरीवाले, दुकानदारांकडून आवश्यक प्रतिसाद मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीकर मुंबईभरात पालिकेच्या 310 निरीक्षक आणि कर्मचार्यांच्या टीमकडून प्लॅस्टिकबंदीकिरोधात ही धडक कारवाई करण्यात येत आहे. मार्केट, परवाना विभाग आणि आस्थापना विभागातून या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कारवाईचे अधिकार दिलेल्या निरीक्षकांची नावे आणि मोबाईल क्रमांक पालिकेच्या वेबसाइटवर देण्यात आले आहेत. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या निरीक्षकांकडून व्यावसायिक, दुकानदारांकर धाडी टाकून ही कारवाई करण्यात येत आहे.
अशी होतेय कारवाई
- प्लॅस्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना, 2018 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेने ठोस उपाययोजना आखल्या आहेत.
- ग्राहक किंवा दुकानदारांकडे प्लॅस्टिक आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ते जमा केले जात आहे.
- मुंबईत 68 ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्रे पालिकेने कार्यान्वित केली आहेत.
- सुरू असलेल्या कारवाईत प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा क कापराकिरोधात दुकानदार, गाळेधारक, मंडई, फेरीवाले, मॉल्समधील गाळेधारक, हॉटेल्स आणि हॉस्पिटलमध्ये कारवाई करून प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला जात आहे.
- या कारवाईत 23 जून 2018 ते 17 सप्टेंबर 2019 या कालाकधीत 76 हजार 282 किलोंचा प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून 4 कोटी 13 लाख 40 हजारांचा दंड कसूल करण्यात आला.

























































