
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने महागाई भत्ता (dearness allowance) तब्बल 11 टक्क्यांनी वाढवला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के महागाई भत्ता मिळतो, यात वाढ करून तो आता 28 टक्के करण्यात आल्याची माहिती ‘आज तक’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्ता 11 टक्के वाढल्याने कर्मचाऱ्यांना मजबूत पगार मिळणार आहे. परंतु यामुळे सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा भार पडणार आहे.
The Dearness Allowance (DA) for Central Government and pensioners employees has been increased from 17% to 28%. This will be applicable from 1st July 2021: Union Minister Anurag Thakur pic.twitter.com/HPwsHUBla8
— ANI (@ANI) July 14, 2021
दरम्यान, कोरोना महामारीमुळे मागील वर्षी 1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली नाही. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे तीन हफ्ते प्रलंबित आहेत. सरकारने कोरोना महामारीमुळे महागाई भत्त्याला स्थगिती दिल्याने हे हफ्ते प्रलंबित असून, सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या हातात घसघशीत पगार येणार आहे.





























































