
नगर जिल्ह्यात रविवारी 105 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने जिल्ह्यात आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 25 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये रविवारी सकाळी 8 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि श्रीगोंदा तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एक रुग्ण तर श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव 1, कोळगाव 1, अजनुज 1, देवदैठण 1 आणि घारगाव येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी सकाळी 75 रुग्णांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. रविवारी आढळलेल्या 8 नव्या रुग्णांसह उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 516 झाली आहे.





























































