
सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा
उरण तालुक्यातील पूर्व भागात सापांचा सुळसुळाट झाला असून जून ते जुलै महिन्यात आठ नागरिकांना विषारी सापाने दंश केला आहे. या नागरिकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नवी मुंबई येथील रूग्णालयात तात्काळ उपचार कऱण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. अशी माहिती कोप्रोली आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी राजाराम भोसले यांनी दिली आहे.
उरण तालुका डोंगर कुशीत वसलेला आहे. यामुळे पावसाळ्यात नागरिक डोंगरावर भाजीपाला गोळा करण्यासाठी, जनावरांना चारण्यासाठी जात असतात. या भागात दाट झाडे झुडपे व गवताळ भाग असल्याने येथे सापांचा मुक्त संचार आहे. यामुळे सर्पदंशाच्या घटना वाढल्याचे भोसले यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
summary…8 snake bite incidents in uran





























































