देवगडमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय तरुणाने 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबतची तक्रार देवगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील आरोपीविरोधात पोक्सो कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेचे वृत्त समजताच अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके यांनी घटनेची माहिती घेतली आहे. देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक गीतांजली जगताप अधिक तपास करीत आहेत.