
सामना प्रतिनिधी, मुंबई
80 टक्के व त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या निराधार व्यक्तींना आता दर महिन्याला एक हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दिव्यांग व्यक्तीसाठी उत्पन्नमर्यादाही 21 हजारांवरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील तब्बल 1 लाख 35 हजार 512 दिव्यांग व्यक्तींना मिळेल.
‘संजय गाधी निराधार अनुदान योजना’ व ‘श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने’तील 40 टक्के ते 79 टक्क्यांपर्यंत दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांना 800 रुपये तर 80 टक्के व अधिक दिव्यांगत्व असलेल्यांना एक हजार रुपये दरमहा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पूर्वी 600 रुपये देण्यात येत होते. अर्थसहाय्यात वाढ केल्यामुळे 34 कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे.
summary-80 per cent disable persons will get one thousand rs as help




























































