कोपरगावात डेंग्यूचे थैमान, 83 रुग्ण आढळले

607

कोपरगावात गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे. गेल्या 18 दिवसात शहरात डेंग्यूचे 83 रुग्ण आढळले आहेत.  यात खाजगी रुग्णालयात 72 तर ग्रामीण रुग्णालयात 3 तर प्रवरा येथे 8 रुग्ण अशा एकूण 83 रुग्णांची नोंद झाली आहे. यात दोन महिन्याच्या बालकाचा ही समावेश आहे

शहरात आतापर्यंतर दीड हजाराच्या आसपास विषाणूजन्य आजाराने बाधित रुग्ण आढळले आहेत.पालिकेकडे कमी कर्मचाऱ्यासह तोकडय़ा पायाभूत सुविधा असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यात पालिका सपशेल  अपयशी ठरली आहे. शहरातील सर्वच भागात डास वाढल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून रचना पार्क, निवारा, भामानगर,सुभद्रानगरसह बऱ्याच भागात कीटकनाशक फवारणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात तब्बल  83 डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवले गेले.  शहरातील खासगी रुग्णालयांतही अचानक डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

शहरात कीटकनाशके औषधे करण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना या कामात नगरपालिका सपशेल अपयशी ठरल्याने शहरात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरले असून ही संख्या वाढली आहे. अशावेळी शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीप्रमाणे काळे कोल्हे कारखान्यांच्या   सौजन्याने”शहराच्या सर्वच भागात कीटकनाशक फवारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या