
तब्बल दहा वर्षे अपयश… कधी गटातच बाद तर कधी गटविजेतेपद… एवढेच नव्हे तर दोन वर्षांपूर्वी जेतेपदाची हुलकावणी तरीही हिमतीने लढलेल्या परब फिटनेसच्या नीलेश दगडेला यशाचे फळ लाभले. बालमित्र जिमच्या रोहन गुरव आणि यूजी फिटनेसच्या उमेश गुप्ताचे आव्हान सहजगत्या मोडीत त्याने प्रतिष्ठsच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर आपले नाव कोरले.
ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर्स असोसिशन आणि मुंबई सबर्बन बॉडीबिल्डिंग ऍण्ड फिटनेस असोसिएशन यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या शेकडो स्पर्धकांचा समावेश असलेल्या दिमाखदार स्पार्टन मुंबई श्री स्पर्धेत नीलेश दगडेसमोर कुणाचेच आव्हान टिकले नाही. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत नीलेशने रोहन गुरव आणि उमेश गुप्ताला आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. नीलेशच्या भीमकाय देहयष्टीपुढे सर्वच्या सर्व खेळाडू अक्षरशः खुजे वाटले. या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार सोहळा शरीरसौष्ठव संघटनेचे अमोल कीर्तिकर, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे, विजय झगडे, भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर आणि स्पर्धेचे पुरस्कर्ते ऋषभ चोक्सी यांच्या उपस्थितीत पार पडला.
शरीरसौष्ठव संघटनेने पेलले शिवधनुष्य
मुंबई श्री स्पर्धेला यंदा कुणी पुरस्कर्ताच मिळत नव्हता. तेव्हा मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि सरचिटणीस राजेश सावंत, सुनील शेगडे यांनी स्पर्धेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सर्वप्रथम त्यांनी स्पार्टन न्यूट्रिशनला पुन्हा एकदा मुख्य प्रायोजक करण्यात यश मिळविले आणि मग एकेक करत सर्व प्रायोजकांना, हितचिंतकांना गाठून स्पर्धेला लागणारा निधी उभारला आणि मुंबई श्रीचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले.
मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपदाचा अंतिम निकाल
महिला (फिजीक स्पोर्ट्स)- 1. रेणुका जनौती (फॉरच्युन फिटनेस), 2. शीतल वाडेकर (सिल्व्हर स्पोर्ट्स क्लब), 3. निशरीन पारीख (वैयक्तिक). महिला शरीरसौष्ठव – 1. हर्षदा पवार (हर्क्युलस फिटनेस), 2. किमया बेर्डे (हर्क्युलस), 3. श्रद्धा ढोके (बिवो वॉर्म). पुरुष (फिजीक स्पोर्ट्स) – 170 सेमी – 1. अनिकेत सावंत (बॉडी वर्कशॉप), 2. आकाश जाधव (बॉडी वर्कशॉप), 3. अनिकेत चव्हाण (रिगस); 170 सेमीवरील – 1. अलंकार पिंगळे (श्री दांडेश्वर), 2. मितेश ठक्कर (माँसाहेब जिम), 3. प्रशांत लाड (बॉडी वर्कशॉप).
पुरुष शरीरसौष्ठव – 55 किलो –1. ओंकार आंबोळकर (बॉडी वर्कशॉप), 2. नितीन शिगवण (फॉरच्युन फिटनेस), 3. नितेश कोळेकर (परब फिटनेस); 60 किलो – 1. दीपक चौहान (बॉडी वर्कशॉप), 2. गणेश पारकर (परब फिटनेस), बप्पन दास (डी.एन. फिटनेस); 65 किलो – 1. आकाश घोरपडे (बॉडी वर्कशॉप), 2. आनंद पांडे (सालम जिम), 3. अरुण पाटील (सालम जिम); 70 किलो 1. उमेश गुप्ता (यू.जी. फिटनेस), 2. संदीप सावले (डी.एन. फिटनेस), 3. -विशाल धावडे (बालमित्र जिम); 75 किलो – 1. रोहन गुरव (बाल मित्र जिम), 2. आशीष लोखंडे (परब फिटनेस), 3. सिद्धांत यादव (आर्यन पॅराडाईज); 80 किलो – 1. गणेश पेडामकर (सर्वेश्वर जिम), 2. विशाल गिजे (बालमित्र जिम), 3. अक्षय खोत (परब फिटनेस); 85 किलो– 1. अनिकेत पाटील (सावरकर जिम), 2. दीपक प्रधान (आर.एम.भट), 3. अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन जिम); 85 किलोवरील – 1. नीलेश दगडे (परब फिटनेस), 2. दीपक तांबिटकर (फॉरच्युन फिटनेस), 3. सुशांत पवार (माऊंटन फिटनेस). मुंबई श्री विजेता – नीलेश दगडे (परब फिटनेस), उपविजेता –रोहन गुरव (बाल मित्र जिम), द्वितीय उपविजेता – उमेश गुप्ता (यू.जी. फिटनेस).


























































