संगमेश्वरात कोरोनाबाधितांची संख्या 88 वर; 63 रुग्णांवर उपचार सुरू

430

गमेश्वर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88 वर जाऊन पोहोचली आहे. यातील 23 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. तर 63 रुग्ण कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत तालुक्यात 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील 920 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात 88 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 64 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. 4 जणांचे तपासणीतून निदानच झालेले नाही.

साडवली येथील ठाकरे विद्यालयातील सेंटरमधून 932 व्यक्तींना क्वारंटाईनमधून घरी सोडण्यात आले आहे. साखरपा महात्मा गांधी विद्यालयातून 114 व बुरंबी दादासाहेब सरफरे विद्यालयातून 296 व्यक्ती या क्वारंटाईन होऊन घरी परतल्या आहेत. तालुक्यात मुंबई व पुणे शहरात आतापर्यंत 39 हजार 359 चाकरमानी आहेत. यातील 16 हजार 359 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील 14 दिवस पूर्ण झालेले 12 हजार 731 व्यक्ती आहेत. सध्या तालुक्यात 3 हजार 628 व्यक्ती क्वारंटाईन आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या