अवघ्या 9 सेकंदांची कमाल… गगनचुंबी ट्विन टॉवर्स भुईसपाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये बेकायदा बांधकाम केलेले महाकाय, गगनचुंबी ‘अॅपेक्स’ आणि ‘सेयान’ हे सुपरटेक ट्विन टॉवर्स रविवारी दुपारी अवघ्या 9 सेकंदांत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भुईसपाट झाले. हिंदुस्थानच्या इतिहासातील इमारत पाडकामाची ही सर्वात मोठी मोहीम तब्बल 3 हजार 700 किलो विस्फोटके आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून फत्ते करण्यात आली.

नऊ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढय़ानंतर हे टॉवर्स पाडले. या पाडकामानंतर परिसरात धुळीचे मोठमोठे लोट उसळले होते. तसेच प्रचंड धमाक्याने परिसर हादरून गेला. कुतुबमिनारपेक्षाही हे टॉवर्स उंच होते. मोहिमेदरम्यान परिसरात 560 पोलीस, राखीव दलाचे 100 जवान आणि एनडीआरएफची चार पथके तैनात होती, तसेच सात हजारांहून अधिक नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित केले होते.