९० टक्के मुसलमान वीजचोर! भाजप आमदाराचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कौशांबी

देशातील ९० टक्के मुसलमान हे वीजचोर आहेत असं विधान एका भाजप आमदाराने केलं आहे. संजय गुप्ता असं या आमदाराचे नाव असून त्यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वीजचोर मुसलमानांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

संजय गुप्ता हे उर्जा विभागाने वीजचोरांवर सुरू केलेल्या कारवाईवर संतापले होते. वीज विभागाचे अधिकारी फक्त हिंदूंनाच त्रास देतात असा त्यांचा आरोप आहे. यामुळेच त्यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करून जा पहिले मुसलमान वस्त्यांमध्ये जाऊन बघा तिथे ९० टक्के मुसलमान वीजचोरी करतात त्यांच्यावर कारवाई करा असं म्हणत या अधिकाऱ्याला झापले.