गेल्या 24 तासात राज्यात आढळले कोरोनाचे 9 हजारहून अधिक रुग्ण, तर 6484 रुग्ण झाले बरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 9 हजार 895 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 47 हजार 502 वर पोहोचली आहे.


गेल्या 24 तासात 6 हजार 484 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 94 हजार 253 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1 लाख 40 हजार 92 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 12 हजार 854 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


मुंबईत गेल्या 24 तासांत 1257 रुग्ण सापडले आहेत. तर 1984 रुग्ण बरे झाले आहेत. तर 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 22 हजार 800 सक्रिय रुग्ण आहेत. तर बरे होण्याचे प्रमाण 72 टक्के इतका आहे.