नववी ते बारावीपर्यंत 4 तासिकांची ऑनलाइन शाळा, शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय शिक्षण विभागाने केजी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्ग घेण्यास शाळांन परवानगी दिली आहे, केजीसाठी दररोज अर्धा तास तर पहिली आणि दुसरीसाठी दररोज एक तास ऑनलाईन वर्ग भरणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यत राज्यात प्रत्यक्ष शाळा सुरू झालेल्या नाहीत. असे असले तरी 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व शाळा व्यवस्थापन समितीने घ्यायचा आहे. दरम्यान शिक्षण विभागाने रात्री उशीरा पूर्व प्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनानुसार यापुढे केजी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहेत.

अशी भरणार ऑनलाईन शाळा

केजी – दररोज 30 मिनीटे – पालकांशी संवाद, मार्गदर्शन

पहिली ते दुसरी – 30 मिनीटांची दोन सत्रे – पालकांशी संवाद, ऍक्टिव्हीटी बेस शिक्षण

तिसरी ते आठवी – 45 मिनीटांची दोन सत्रे – ऑनलाईन शिक्षण

नववी ते बारावी –  45 मिनीटांची चार सत्रे – ऑनलाईन शिक्षण

ऑनलाईन वर्गावर भाष्य करणारे हे छायाचित्र सोशल मीडियावर गरागरा फिरत आहे.

कोरोनाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याचा निर्णय होणार आहे. तोपर्यत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणच दिले जाणार आहे, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.