सूर्याची भट्टी पेटली, चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

मॉन्सूनने निर्धारित वेळेपेक्षा तीन दिवस अगोदर केरळचा उंबरठा ओलांडल्याने बळीराजा आनंदात असला तरी, विदर्भातील सर्वसामान्य नागरिक मात्र वाढत्या उन्हामुळे प्रचंड त्रस्त आहेत. मंगळवारी नागपुरात तापमानाने या मोसमातील नवा उच्चांक गाठला, तर चंद्रपूर येथे विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.

नागपूर आणि चंद्रपुरात उन्हाची भट्टी चांगलीच पेटली आहे. मंगळवारी चंद्रपुरात देशातील सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तर ब्रम्हपुरी आणि वर्धा येथे ४७.० अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. नागपूर येथे ४६.७, गडचिरोली ४५.०, अमरावती ४५.६, गोंदिया ४४.७, अकोला ४४.० व यवतमाळ येथे ४४.५ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली.