११ जूनपर्यंत मुसळधार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिह्यात ११ जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी १०७७ या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर व मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www/imd.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.

हे टाळावे…
नागरिकांनी मुसळधार पावसामध्ये घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा. वाहनाने अथवा पायी प्रवास करु नका. पाऊस पडत असताना झाडाखाली उभे राहू नका. मोबाईलवर संभाषण करू नका, इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा पसरवू नका. कोणत्याही वृत्ताची अधिकृत सूत्रांकडून खातरजमा करून घ्या. जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.