
सामना ऑनलाईन । मुंबई
कला… मग ती कोणतीही असो… तिला आत्मसात करण्याची धडपड, वृत्ती कलाकाराकडे असेल तर ती निश्चितच साध्य होते. वाळू शिल्पकला ही त्यापैकीच एक… अत्यंत मोहक, इतरांचे लक्ष वेधून घेणारी … सामाजिक भान जपणारी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी ही कला… वाळू शिल्पकाराला अनोखा आनंद मिळवून देणारी आहे. ज्यांना ही कला शिकण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा उत्पन्नासह मनाला समाधान आणि उत्पन्न मिळवून देणारा मार्ग आहे.
आवश्यक गुण आणि पात्रता
-वाळू शिल्पकार होण्यासाठी आवश्यक असलेल्या पदवीपेक्षाही यासाठी लागणारे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.
-नवी कलाकृती घडवण्याची इच्छाशक्ती असायला हवी. यामुळे शिल्पातून नावीन्य आणि उत्साहाचा आनंद इतरांना मिळेल.
-उत्तम निरीक्षण क्षमता, एकाग्रता, सौंदर्याची जाण इत्यादी कौशल्ये ही कला आत्मसात करण्यासाठी आवश्यक आहेत.
-वाळू शिल्पातून पर्यावरण जागृती, एड्स जागृती असा संदेश देता यावा यासाठी सामाजिक अभ्यास हवा.





























































