
सामना प्रतिनिधी । भाईंदर
आज उत्तन पातान बंदर येथील किनाऱ्यावर सकाळी ६:३० वाजता वीज पडून एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
उत्तन मधील पातांन बंदर या गावात वीज पडल्याने स्टनी अदमनी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच सहा जण जखमी आहेत. दरम्यान, वीज पडल्याने अनेकांच्या घराची वीज गेली आहे.


























































