
सामना ऑनलाईन । मुंबई
शनिवारी मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस मुंबईमध्ये पाऊस धुमाकूळ घालेल अशी शक्यता व्यक्त हवामान विभागाने व्यक्त केली होती. परंतु आता हा इशारा मागे घेण्यात आला असून मुंबईमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडेल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबई आणि उपनगरामध्ये गेले दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू होती. शनिवारी मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मच्छिमारांनी देखील समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी पाऊसच पाऊस
शनिवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत कुलाबा येथे ९२ मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. माझगाव येथे सर्वाधिक १०९ मिलीमीटर पावसाची दिवसभरात नोंद झाली, त्याखालोखाल वांद्रे-कुर्ला संकुल येथे ९७ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला. उपनगरांमध्ये मालाड येथे सर्वाधिक ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
























































